पळस गांव खुर्द साझातुन अवैध गौण खनिजाची तस्करी, महसूल विभागाचे दुर्लक्ष

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी ,न्यूज जागर

नागभीड तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगर फोडून उजव्या गोसीखुर्द कालवा चे काम जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी ब्लास्ट केलेले गिट्टीखदान असल्याने गिट्टिचा साठवण केलेली आहे. मात्र या ठिकाणाहून गौण खनिज गिट्टी व मुरूमाची विनापरवाना वाहतूक केली जात आहे. दिवसाढवळ्या गौण खनिज खुलेआम पणे तळोधी बालापुरला वाहतूक होत असताना कारवाई केली जात नाही त्यामुळे शासनाला करोड रुपये चे नुकसान होत आहे. महसूल विभाग व संबंधित तस्करी धारकांचे मधुर संबंध असल्याने कारवाई होत नाही त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून संबंधित अवैध गौण खनिज ची तस्करी करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.