भाजपाच्या सास्ती शाखेतर्फे माजी खासदार अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त ब्लँकेट वाटप

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

राजुरा

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या सास्ती शाखेने गरजूंना ब्लँकेट वाटप केले.यावेळी अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. ….भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर नरड हे मागील २५ वर्षांपासून अहिर यांच्या वाढदिवसानिमित्य विविध कार्यक्रम घेत आहे.या अगोदर त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करून त्यांचे तोंड गोड केले आहे.अहिर यांच्या प्रत्येक वाढदिवशी मधुकर नरड हे स्वखर्चाने ब्लँकेट वाटप करीत आहे.या वाढदिवशी त्यांनी सास्ती परिसरातील गरीब गरजूंना ब्लँकेट वाटप करून ऐन थंडीच्या दिवसात ऊब देण्याचा प्रयत्न केला आहे.नरड यांचे सामाजिक क्षेत्रातील कार्य सुध्दा वाखाणण्याजोगे आहे.त्यांनी पक्षाच्या माध्यमातून अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे.आंदोलन करून न्याय हक्कासाठी लढा दिला आहे.यावेळी ब्लँकेट वाटप करतांना त्यांच्या सोबत प्रशांत घरोटे,कृष्णा अवतार संबोज,सचिन लोहबडे, पुरुषोत्तम लांडे,दीपक देरकर, रमेश रोगे,गणपत काळे,राजकुमार निषाद,किशोर बोनगीरवार, दिलीप नारड,नागेशकुमार,रवींद्र मेश्राम,लक्ष्मण बेले,इंद्रजित मेश्राम, वरलक्ष्मी जंजिरला,बंडू ररामटेके, बापू माथानकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.