घोडपेठ येथील विठ्ठल-रुक्मिनी मंदिरात दहिहांडी कार्यक्रमाचे आयोजन.

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

खासदार बाळु धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गदर्शनात घोडपेठ येथील विठ्ठल-रुक्मिनी मंदिरात कार्तिक पोर्णिमेच्या निमित्ताने दहिहांडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय मंदिरात या सोहळ्यानिमित्त भजन,पुजन आदी विवीध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल-रुक्मिनी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष ईश्वर निखाडे,सचिव अरुण मिलमीले,सामाजीक कार्यकर्ते अशोक येरगुडे,संजय नागपुरे,लहू जोगी,भाऊराव लवकर,धनराज गानफाडे,रमेश ऊरकुडे,ज्योती मोरे,सिमा मिलमीले,छाया महाकुलकर,चामारे ताई,कविता नागपुरे, डाहुले ताई,आदी मान्यवर उपस्थित होते. मंदिरातील हा सोहळा दिवरभर चालला.शेवटी महाप्रदाने सोहळ्याची सांगता करण्यात आली. सोहळ्याला घोडपेठ येथील गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.