श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी, न्यूज जागर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा येथील इयत्ता 5 वी चे पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झालेले आहेत.
यामध्ये धनश्री कैलास भगत 174गुण, साहिल दत्ता सोलनकर 158 गुण, लक्ष्मी बाबु होळगीर 148 गुण, कल्याणी तातेराव बिंगेवाड-140 गुण, सोहम जनार्धन देवकते 136 गुण मिळवून शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत। त्यांच्या या यशाबद्दल शाळेतील मार्गदर्शक शिक्षक दिपक गोतावळे, मुखळा मलेलवार,दत्ता दोरे,रुपेश मांदाळे,उषा डोये, मुख्याध्यापक एल एम पवार,केंद्रप्रमुख किसन बावणे, शा व्य समिती व पालक यांच्याकडून कौतुक व अभिनंदन करण्यात आले।