श्री.अरुण बारसागडे, चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी न्यूज जागर
स्थानिय चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालया जवळील बिरसा मुंडा चौकात जननायक बिरसा मुंडा यांची 147 वी जयंती बिरसा सेना व आँल इंडिया पँथर सेना चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उदघाटक मा. दिपक भाई केदार आँल इंडिया पँन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष हे होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. अशोकजी तुमराम सर, अशोकजी ऊईके, रूपेशभाई निमसरकार, संगिताताई येरमे, वंदनाताई गेडाम, संतोषभाई डांगे, राजेन्द्रजी धुर्वे, विजयसिंह मडावी, कृष्णाजी मसराम, कमलेश आत्राम, जितेश कुळमेथे आदि प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळेस बिरसा सेना व पँथर सेनाच्या वतीने चंद्रपुर शहरातील मुख्य मार्गाने बाईक रँली काढून आदिवासी एकतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमा प्रसंगी डाँ. शारदाताई येरमे यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकशाहिर बाबुरावजी जुमनाके यांनी केले. तर आभार कमलेश आत्राम बिरसा सेना जि अध्यक्ष यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मारोती जुमनाके, शंकर ऊईके, सुरज गावडे, त्यागीभाई देठेकर, सुमितभाई कांबळे, विद्याताई किन्नाके, लताताई पोरेते, प्रिती मडावी, प्रिती आत्राम, पुरुषोत्तम सोयाम, वामन भाऊ, अमर चांदेकर, रुपा चांदेकर, कौस्तुभ आत्राम यांनी अथक परिश्रम घेतले.