श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
शासकीय सेवेत लागलेल्या युवकांचा सुद्धा सत्कार
नांदा फाटा प्रतिनिधी! नांदा येथे नुकताच अखिल भारतीय लोहार समाज संघटना शाखा नांदा व समस्त गावकरी बंधू यांचे वतीने लोहार समाजातील पहिले सप्त खंजिरी वादक विद्रोह कार प्रबोधन करते नयन दादा मडावी यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम पार पडला संपूर्ण देशामध्ये सात खंजिर्या वाजवत समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी प्रथा परंपरा भोंदूगिरी व वाईट चालीरीती यांच्यावर आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांचा आदर्श समोर ठेवून सत्यपाल महाराजांचा वसा घेत नयन दादा मडावी यांनी सुद्धा समाज प्रबोधनाला सुरुवात केलेली असल्याकारणाने त्यांचा जाहीर सत्कार शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आला त्याचप्रमाणे नुकताच जाहीर झालेला स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल ज्यामध्ये गावातील तीन युवकांनी विविध सैन्य दलामध्ये घवघवीत यश संपादन करीत गावाच्या शिरपेच्यामध्ये मानाचा तुरा रोवत आपला गाव व परिवाराचं नाव मोठं केलं अशा इटनकर, इम्तियाज शेख व आकाश आत्राम यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी गावच्या नवनियुक्त सरपंच सौ मेघा नरेश पेंदोर , उपसरपंच पुरुषोत्तम आसवले, रत्नाकर चटप, प्रकाश बोरकर, मारुती जमदाडे ,भास्कर लोहबडे ग्रामपंचायत सदस्य अप्सांडे मॅडम मंचावरती प्रामुख्याने उपस्थित होते नयन दादा मडावी यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाकरिता शेकडो गावकऱ्यांनी उपस्थिती दाखवली सदर कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता गावातील लोहार समाजाच्या नवयुवकांनी मागील पंधरा दिवसापासून अथक परिश्रम घेतले