श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२२/११/२०२२
जिवती
अतिदुर्गम आदिवासी बहूल जिवती तालुक्यातील पाटण येथील राजीव गांधी महाविद्यालयात सांसद आदर्श ग्राम समिती महाराष्ट्र राज्य मुंबईचे सदस्य तथा आदर्श ग्राम पाटोदाचे सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांचा मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या मान्यवरांचा सत्कार पांडुरंग जाधव मित्रपरिवार तर्फे आदर्श सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला,यात बीबी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीधर काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती राजुराचे माजी सभापती आबाजी पाटील ढुमणे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे, PSI राहुल चव्हाण, 365 दिवस चालणाऱ्या जिल्हा परिषद पालडोह शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र परतेकी, जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल वडगाव जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक काकासाहेब नागरे यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भास्करराव पेरे पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषनात स्वत:च्या गावात केलेल्या विकासाच्या कामाचा माहिती सांगून नवनियुक्त सरपंच, उपसरपंच,सदस्य,व सामाजिक कार्यकर्ते व गावातील नागरिकांना गावाच्या विकास करायचा असेल तर स्वार्थ न पाहता सर्वांनी एकमेकांना सहकार्य करून ग्रामविकास साधण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी चंद्रपूरचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरुगनंथम एम (भा. प्र. से.), जिवती नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष तथा गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे अध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाशजी जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्या तथा नगरसेविका सतलूबाई जुमनाके, गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्था जिवतीचे सचिव तथा ग्रामपंचायत सदस्य बापूरावजी मडावी,नगरसेविका लक्ष्मीबाई जुमनाके, माजी उपसभापती मनोज आत्राम, भेंडवी ग्रामपंचायतीचे सरपंच शामराव कोटनाके, सामाजिक कार्यकर्ते वाघूजी गेडाम,माजी सभापती भीमरावजी मेश्राम, नांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघाताई पेंदोर, राज गोंडवाना गडसंरक्षण समितीचे अध्यक्ष भीमराव पाटील जुमनाके,वाघूजी ऊईके,उपसरपंच गणेश शेटकर,जिवती येथील व्यापारी ओसोसीएशन चे अध्यक्ष महेबूबभाई शेख, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, ग्रामपंचायत सदस्य रत्नाकर चटप, उपसरपंच वासुदेव चापले,माजी सरपंच अरुण उदे, माजी सरपंच हनुमंत कुमरे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार यांची उपस्थिती होती.
आयोजित कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्याबद्दल ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, अंगणवाडी सेविका,आशा सेविका,गाव पाटील,पोलीस पाटील, नाईक, सामाजिक कार्यकर्ते,कारभारी, तथा विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकारी पदाधिकारी यांचे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा कार्यक्रमाचे आयोजक पांडुरंग जाधव यांनी आभार मानले,
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोदरू पाटील जुमनाके सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकेत कुळमेथे यांनी तर आभार नितीन बावणे यांनी मानले.