पाण्याच्या टाकीचे निष्कृष्ट बांधकाम – गावकऱ्यांनी काम बंद केले

श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर

दि.३१/११/२०२२ 

शेगाव 

वरोरा तालुक्यातील शेगाव येथून जवळ असलेल्या अर्जुनी तूकुम येथे जल जीवन मिशन अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे हे काम गावकऱ्यांनी ग्रामसभेत ठराव घेऊन बंद केलेले आहे

low quality construction work of water tank
केंद्र शासना अंतर्गत जिल्हा परिषद ला निधी देऊन जलजीवन मिशन अंतर्गत सर्व ग्रामपंचायत पातळीवर पिण्याच्या पाण्याचे टाकीचे बांधकाम करण्यात येत आहे मात्र हे काम ठेकेदार यांच्यामार्फत निष्कृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले असता आज गावामध्ये असलेल्या ग्रामसभेतच ठरवले व प्रत्यक्ष गावकऱ्यांनी जागेवर जाऊन पाहनी केले असतात त्यामध्ये वापरण्यात येणारे, लोहा, गिट्टी, कमी प्रमाणात असून पाहनीवेळी रेती आणि सिंमेटचा वापर करण्यात आल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले तुरंत पिण्याच्या पाण्याचे टाकीचे बाधकाम थांबवून कामगारांना काम बंद करण्यास सांगून संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी यावेळी उपस्थित नागरिकाकडून करण्यात आली आहे