श्री.अरुण बारसागडे,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
भद्रावती,दि. १०/१२/२०२२
येथील लोकमान्य विद्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे पर्यवेक्षक रुपचंद धारणे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. किशोर हुमणे, ज्येष्ठ शिक्षक देवीदास जांभुळे, ज्येष्ठ शिक्षिका लीला खुजे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रफुल्ल वटे मंचावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.हुमणे यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन शिक्षिका शुभांगी उराडे यांनी केले.तर आभार शिक्षक विकास मोहिते यांनी मानले.कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.