आकापूर येथे विविध कार्यक्रम

श्री.अरुण बारसागडे ,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

सावरगाव,दि.२१/०२/२०२३

नागभीड तालुक्यातील आकापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव स्वराज्य संघटना आकापूर, यांच्यावतीने शिवजन्मोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते.

यामध्ये सकाळी गावामध्ये वेशभूषा बँड पथक यांच्या सहाय्याने रॅली काढण्यात आली व त्यामधून एक चांगला व शांततेचा संदेश देण्यात आला, यावेळेस गावामध्ये महिलांनी व सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून गाव स्वच्छ करून रांगोळी घालून गावामध्ये संपूर्ण रस्ते सजविण्यात आले होते व सजावट करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री कुणाल पा. गहाणे सरपंच ग्रामपंचायत आकापूर, प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री खोजरामभाऊ मरसकोल्हे माजी जिल्हा परिषद सदस्य , माननीय हेमंतभाऊ लांजेवार सरपंच ग्रामपंचायत उसळमेंढा,मा. प्रणायताई गड्डमवार माजी प.समिती सभापती नागभीड, हे होते .

तसेच आई-वडिलांच्या सन्मानार्थ आई-वडील पूजनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित केला गेला होता , व दिवसभर गावातील महिला पुरुष व मुलांसाठी विविध स्पर्धांची आयोजन करण्यात आला होता त्यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा ,जोडीने पाय बांधून धावणे स्पर्धा, ग्लास स्पर्धा ,चमचा गोळी स्पर्धा, कबड्डी स्पर्धा,रांगोळी स्पर्धा
यांचा आयोजन मोबाईलच्या युगामध्ये ग्राउंड वर खेळता यावे यासाठी करता करण्यात आला होता यामध्ये सर्वांनी मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग नोंदविला होता.newsjagar

यानंतर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन शिवराज्य संघटना आकापूर यांच्यावतीने करण्यात आलेले होते, त्यामध्ये उद्घाटक माननीय संजयभाऊ गजपुरे मा.जि. परिषद सदस्य चंद्रपूर, सह उद्घाटक मा.संतोष भाऊ रडके प. समिती सदस्य, मा. सुखदेव पा भाकरे सर,मा. व्यंकटेश भाकरे, श्रीमती कल्पना भाकरे . तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डेव्हिड मेश्राम सर ग्रामसेवक आकापूर, सुरेश सडमाके, रसिका ताई बाळबुद्धे, नीताताई बोरकर ,दुर्गा चनफने, शालू आत्राम ,विनोद भाकरे ,राजू चौधरी, राजेश्वर डहारे, कल्पना भाकरे, जनार्दन निकुरे ,मंगेश सहारे, अरुणा मळावी, राऊत सर दमकेसर ,मदनकर सर ,भोयर सर संतोष भाकरे आदी व संपूर्ण आकापूर येथील गावकरी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संचालन श्री अमोल टेमदेव भाकरे यांनी केले तर प्रास्ताविक सचिन भाकरे व आभार प्रदर्शन येशू भाकरे यांनी केले, व कार्यक्रमासाठी संपूर्ण शिवस्वराज्य संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते व सर्वांनी कार्यक्रम पार पाडण्यास सहकार्य केले.