श्री.अरुण बारसागडे , चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,न्युज जागर
नागभीड,दि.३०/०४/२०२३
नागभीड येथिल कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पुन्हा भाजपाने निरविवाद बहुमताने सत्ता काबिज करुन आपले वर्चस्व प्रस्तापित केले आहे.शनिवारला लागलेल्या निकालात १८ पैकी १४ जागा भाजपाने काबीज केले आहे.तर ४ जागांन वर काँग्रेसला समाधान मानावे लागले आहे. भाजपाच्या विजयी उमेदवारांन मध्ये सेवा सहकारी सर्वसाधारण गटातुन आनंद कोरे,अरुण गायधनी,मनोहर चौधरी,गणेश तर्वेकर ,अजय देवाडे,अवेश खाँ.पठाण,रमेश बोरकर,दिलीप विगम, तर महीला गटातुन संगिता गहाणे,नेहा सिद्धमशेट्टीवार, ग्राम पंचायत गटातुन राजेश घिये,पंचम खोब्रागडे,अडते व्यापारी मधुन ज्ञानेश्वर भेंडारकर,हमाल मापारी मधुन धनराज ढोक हे विजयी झाले आहेत. तर काँग्रेस पुरस्कृत नरेद्र हेमणे, पुरुषोत्म बगमारे,हेमंत लांजेवार,अनिल डोर्लीकर हे विजयी झाले आहे. newsjagar