जातिय भावनेतुन विद्यार्थ्याची हत्या करणा-या शिक्षकाला फाशी द्या- वंचित बहुजन आघाडी ची मागणी

 

अरुण बारसागडे, नागभीड न्यूज जागर (तालुका प्रतीनिधी )

राजस्थान राज्यातील जालोर जिल्हा सुराना गावातील नऊ वर्षीय इंद्रकुमार मेघवाल या विद्यार्थ्याला सार्वजनिक माठातील पिण्याच्या पाणी पिल्यामुळे अमानुष मारहान करीत हत्या केल्या‌मुळे संबधीत शिक्षक छैला सिंह याला फाशीची शिक्षा देण्यात यावी करीता  केंद्रीय गृहमंत्री यांना सोमवारला नागभिड तालुका वंचित बहुजन आघाडी तर्फे निवेदन देण्यात आले.शाळा हे विद्येचे माहेरघर आणि शिक्षकाला गुरु चे स्थान असतांना पधंरा आँगस्ट २०२२ ला भारत देशात स्वातंत्र्याचा ७५वा अमृत महोत्सव साजरा करीत असतांना देशात आजही जातीयत्तेच्या आधारावर नऊ वर्षाच्या जातीचे अज्ञान असलेल्या विद्यार्थ्याला सार्वजनिक ठिकानातील पाणी पिण्यावरुन हत्या केली जात आहे.त्यामुळे अश्या शिक्षकाला फाशीची द्यावी करीता केंद्रीय गृहमंत्री यांना नायब तहसीलदार मार्फत वंचित बहुजन आघाडी नागभिड द्वारे निवेदन देण्यात आले.यावेळी नागभिड तालुक्यातील महिला जिल्हा सचिव कल्पना खरात , तालुकाध्यक्ष खेमदेव गेडाम, शहरध्यक्ष मानिक दोहीतरे , अश्विन मेश्राम , मधुकर भरडे , राजकुमार मेश्राम , धर्मविर गराडकार , निमराज मेश्राम , मनोहर खोब्रागडे , किशोर मेश्राम , इ कार्यकर्ते उपस्थित होते.