चामोर्शी तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
चामोर्शी यशोधरा विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथे 5 सप्टेंबर रोजी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून स्वयंशासन दिन उपक्रमातून स्वयं स्फूर्तीने विद्यार्थी शिक्षक म्हणून शालेय प्रशासन चांगल्या पद्धतीने जबाबदारीने सांभाळल्याने त्यांच्या सुप्तगुणांना वाव मिळाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य शाम रामटेके होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमोल दुर्गे, प्रकाश बारसागडे , राजू धोडरे , प्रवीण नैताम, साजेदा कुरेशी, सरिता वैद्य, जयश्री कोठारे, प्रा. वालदे , प्रा. भांडेकर , प्रा. गव्हारे , अंकुश दुर्गे उपस्थित होते . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचारी सुधाकर भोयर, रुपलता शेंडे, लक्ष्मण गव्हारे तसेच शालेय मंत्रिमंडळातील सर्व पदाधिकऱ्यांनी सहकार्य केले. संचालन शुभम पेंदोर तर आभार दुर्गा मंडरे हिने मानले.