श्री. नंदकिशोर वैरागडे, प्रतिनिधी न्यूज जागर
कोरची. दि. 16/9/22
येथे बौद्ध समाजाच्या जागेत सभामंडप तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून मिळण्यासाठी येथील बौद्ध समाज व रमाई महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजभे यांचेकडे मागणी केली. त्यावेळी आमदार गजभे यांनी आपल्या विकास निधी मधून सभामंडपाकरीता निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.
यापूर्वी येथील बौद्ध समाज व रमाई महिला मंडळाच्या वतीने नगरपंचायत ला निवेदन देऊन सभामंडपाची मागणी केली होती. परंतु दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत आलेला निधी सभामंडपाकरीता देण्यास नगरपंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे अध्यक्षा हर्षलता भैसारे, उपाध्यक्ष हीरा राऊत व बांधकाम सभापती तेजस्विनी टेंभुर्णे हे तिन्ही लोक बौद्ध समाजाचे आहेत. तरीही निधी मिळू नये यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरे विशेष म्हणजे नगरपंचायतच्या निवडणुकीत येथे कांग्रेस सोबत आरपीआयची युती होती.
कोरची नगरपंचायतला दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत लाखो रुपयांचे निधी प्राप्त झाले आहेत. या निधीमधून बौद्ध समाजाच्या जागेवर सभामंडप व वालकंपाऊंड तयार करण्यात यावे.याकरीता येथील बौद्ध समाज व रमाई बहुउद्देशीय सामाजिक महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना 25 आगस्ट ला निवेदन दिले.कोरची येथे बौद्ध समाजाची 600 पेक्षा जास्त लोकसंख्या आहे. त्यामुळे दलित समाजाला मिळणाऱ्या सर्व योजना समाजाला मिळायला पाहिजे.
२०१५ पासून आजपर्यंत दरवर्षी या योजनेअंतर्गत लाखोंचा निधी मंजूर होत आला आहे .शासन नियमाप्रमाणे हा निधी दलितांच्या वस्तीत नाली, वीज, पाणी, रस्ते, सभामंडप, वाल कंपाउंड इत्यादी कामाकरिता खर्च करायला पाहिजे. परंतु कोरची या गावात दलितांची वस्ती एका ठिकाणी नाही .दलितांची घरे संपूर्ण गावभर विखुरली आहेत. त्यामुळे दलित समाजाला या योजनेचा लाभ मिळाला नाही तरीही हा निधी दलितांच्या वस्तीत खर्च केल्याचे आजपर्यंत कागदोपत्री दाखविण्यात आले आहे.
दलित वस्ती सुधार योजना/नाविन्यपूर्ण पूर्ण योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या संपूर्ण निधीचा कोरची येथील बौद्ध समाजाच्या जागेत सभामंडप करून द्यावे. सोबतच वाल कंपाउंड तयार करून द्यावे .
तसेच यानंतर भविष्यात या योजनेअंतर्गत येणाऱ्या निधीची विल्हेवाट आम्ही प्रस्तावित केलेल्या विषयावर विचार करावा यासाठी निवेदन देण्यात आले.
नगरपंचायतवर कांग्रेस पार्टी चे शासन आहे. नगरपंचायत च्या निवडणुकीत काँग्रेस सोबत आरपीआयची युती होती. त्यामुळेच स्पष्ट बहुमत मिळाले. तालुक्याच्या ठिकाणी, सरकार मध्ये राहूनच नाही तर मुख्य तीनही पदावर बौद्ध लोक असताना त्यांची गोष्ट क्ष व्यक्ती ऐकत नाही. तर कोरची चा विकास पुन्हा पाच वर्षे होईल अशी कल्पना करणे गैर आहे. अशी येथील आरपीआयची च्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली.