शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देसाईगंज येथे “कौशल्य पदविदान सोहळा संपन्न

 

देसाईगंज: दि.१७/९/२०२२
भारत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास, मंत्रालय, नवी दिल्ली व व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या सूचनेनुसार सम्पूर्ण देशातिल सर्व आय. टि. आय मध्ये प्रथमत:च “कौशल्य पदविदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी यांत्रिक डिझेल ट्रेडमध्ये देशात प्रथम आलेला प्रशिक्षणार्थी सुशिल अनिल हेडाऊ याचा मा. पंतप्रधान यांच्या हस्ते दिल्ली येथे आजच सत्कार होत असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितित त्यांच्या आई- वडिलांचा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननिय श्री. कृष्णाजी गजबे, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमात महाराष्ट्रामधुन विविध ट्रेडमधुन विशेष प्रावीण्य मिळविलेले प्रशिक्षणार्थी प्रवीण पिंपळकर, साहिल वाघधरे, कु. ऋतुजा बारापात्रे, कु. प्रियंका ढोरे, कु. अंजली सोंदरकर, तुषार झुरे व कुंदन ढोरे यांचे व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच संस्थेमधुन विविध ट्रेडमधील पहिल्या तीन प्रावीण्य मिळविलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाला प्रमुख अतिथि म्हणून श्री. आफताब आलम खान, ए. ए. एनर्जी ली., श्री. मुरलीधर सुंदरकर सुभाष इंजिनियरिंग वर्क्स, श्री. प्रभातकुमारजी दुबे अध्यक्ष पत्रकार क्लब वडसा, श्री. राजरतन मेश्राम सचिव पत्रकार क्लब वडसा, जेष्ठ पत्रकार शामराव बारई, विलास ढोरे, नासिर जुम्मन शेख, श्री. ईलियास खान, श्री. घनशाम कोकोडे, श्री. रविंद्र कुथे, श्री. शैलेष पोटवार इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या उद्घाटन स्थानावरून आमदार गजबे म्हणाले की आयटीआय चे विद्यार्थी उद्योजक बनून नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात , देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला “डिजिटल इंडिया” “वोकल फॉर लोकल”, “मेक इन इंडिया” असे बहुआयामी प्रकल्प देऊन भारतातील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिल्याआहेत .
भारतातील टोकावर असणाऱ्या गडचिरोली आदिवासी व नक्षलग्रस्त जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा क्षेत्रातील देसाईगंज येथील कू. सुशील हेडाऊ यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी घेतलेल्या वार्षिक परीक्षेतील डिझेल मेकॅनिक या अभ्यासक्रमात भारत देशात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल ही आपल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब असून त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील देसाईगंज औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील सहा प्रथम आणि द्वितीय व तृतीय क्रमांकाचे मानकरी पात्र ठरले असून हे आपल्या गडचिरोली जिल्ह्यासाठी अभिमानास्पद व गौरवास्पद बाब आहे.