स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम बहुध्देशिय संस्थेच्या वतीने मौजा कोठी,धोडराज येथे आरोग्य शिबिर

न्यूज जागर गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी 

Health camp arrange at kothi

भामरागड ता.प्र या.१८
भामरागड तालुक्यात मागील आठवड्यात परतीच्या पावसामुळे काही ठिकाणी पूर येऊन काही प्रमाणात नुकसान झाले होते. पूर ओसरल्यानंतर होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता. दुषित पाण्यामुळे विविध रोगराई पसरण्याची शक्यता आहे. तसेच भामरागड तालुक्यातील दुर्गम अशा गावांना आरोग्य सेवेसाठी अनेक अडचणी आहेतच त्यासाठी आरोग्याच्या द्रुष्टीने शक्य तितकी मदत करण्याचे अहेरी विधानसभा क्षेत्राचे माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या सुचनेनुसार हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या पुढाकाराने स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम बहुध्देशिय संस्थेच्या वतीने भामरागड तालुक्यातील कोठी व धोडराज येथे 17 जुले रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

भामरागड तालुक्यात जंगलात वास्तव्य असलेल्या खेड्यात पावसाळ्यात मोफत आरोग्य सेवा पुरविण्याचे द्रृष्टीने आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली हर्षवर्धन बाबा आत्राम, सून डॉ. मितालीताई आत्राम यांनी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात केले. आरोग्यासाठी शक्यतो मदत करण्याच्या द्रुष्टीने काम करावं तसेच दीर्घ आजारग्रस्तांना जर शस्त्रक्रियेसाठी पुढे कुठे नेता येईल का याउद्धेशाने भामरागड तालुक्यातील कोठी परिसर तसेच धोडराज परिसारातील नागरिकांसाठी स्व. स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम संस्थेच्या वतीने आरोग्य शिबीर घेण्याचा निर्णय घेतला.असे हर्षवर्धन बाबा आत्रम यांनी याप्रसंगी सांगितले. 17 सप्टेंबर २०२२ रोज शनिवारी तालुक्यातील मौजा कोठी व धोडराज येथे मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या करिता (डॉ. संगीता खोब्रागडे स्रीरोग तज्ञ md,gyanacolojist) , (डॉ गोपीचंद वरटकर md, medicine कर्करोग विशेषज्ञ oncolojist), (डॉ. योगिता वरटकर दंतरोग तज्ञ bds), डॉ. मिताली आत्राम यांनी आरोग्य तपासणी केली व मोफत औषधी देण्यात आली.यावेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिरके,पत्रकार कापरे सर आदींची सहकार्य लाभले. पुढच्या शनिवारी भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे शिबीर होणार आहे. या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन हर्षवर्धन बाबा आत्राम यांनी केले.

नक्षल ग्रस्त भागात फिरायला कोणी पुढे येत नाही परंतु अश्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये भामरागड तालुक्यातील कोठी सारख्या ठिकाणी शिबिरात येऊन रुग्ण तपासणीसाठी सेवा देण्यासाठी पुढे आलेल्या डॉक्टरांच्या चमुचे आभार व्यक्त करुन यापुढे दर शनिवारी अहेरी येथे स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम बहुध्देशिय संस्थे तर्फे डॉ. संगीता खोब्रागडे, डॉ.योगीता वरटकर,डॉ.गोपीचंद वरटकर यांना अहेरी येथे येऊन गोर गरीब बांधवासाठी मोफत आरोग्य सेवा देण्याची विनंती डॉ. मिताली आत्राम, हर्षवर्धन आत्राम यांनी केली.

डॉक्टरांनी आपली अमूल्य वेळ देण्यासाठी होकार दिल्याने सर्वत्र हर्ष व्यक्त होत आहे.दर शनिवारी अहेरी येथील स्व.स्नेहादेवी धर्मरावबाबा आत्राम संस्था हॉस्पिटल मध्ये सदर तज्ञ डॉक्टर्स येथील आणी मोफत तपासणी करतील अशी माहिती शिबिरा दरम्यान हर्षवर्धन बाबा आत्राम व डॉ. मिताली आत्राम यांनी दिली.याशिबिरासाठी कोठी येथील ग्रामस्थ धोडराज ग्रामस्थांनी सहकार्य केले.