येरकड आविकात विकलेल्या शेतकऱ्याच्या बारदान्याचे पैसे कधी ? पैसे देण्याची निवेदनातून मागणी

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर 

धानोरा तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेत शेतकऱ्यांनी धान्य विकले मात्र धान्य विकताना बारदाना परत करूत नाहीतर त्याचे पैसे देऊ या तत्त्वावर शेतकऱ्यांनी बारदान्यासहित धान्य दिलेत परंतु वर्ष उलटूनही बारदान्याचे  पैसे मिळाले नाही म्हणून बारदान्याच्या कट्ट्याचे पैसे कधी? हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उपस्थित झालेला आहे सदर कट्ट्याचे पैसे देण्याची मागणी शेतकऱ्यांनी उपप्रादेशिक व्यवस्थापक कार्यालय धानोरा यांना निवेदनातून केली आहे

सविस्तर वृत्त असे की धानोरा तालुक्यात एकूण 13 अविका आहे तालुक्यात शेतकऱ्यांची व्यापारी लोकांपासून होणारी फसवणूक थांबवी शेतकऱ्यांना एकाधिकारचा भाव मिळावा या उद्देशाने तालुक्यात सरकारने धान खरेदी केंद्र सुरू केले याकरिता बारदाण्याची व्यवस्था शासन करून देते मात्र तालुक्यातील येरकड येतील धान खरेदी केंद्रात खरीप हंगामात 2021 22 येथील आदिवासी सेवा सहकारी संस्थेत येरकडला स्थानिक शेतकऱ्यांनी धान्य विकले खरेदी केंद्रावर कट्टे उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी मधुकर जगन्नाथ भैसारे 100 कट्टे जयवंता मनिराम मडावी 75 कट्टे रखमाबाई नरोटे 125 कट्टे अशोक नामदेव कोल्हे 125 कट्टे शंकर चमारू मडावी 100 कट्टे यांनी खरेदी केंद्राला दिले परंतु अजून पर्यंत त्यांच्या कट्ट्याचे पैसे मिळाले नाहीत हीच परिस्थिती धानोरा तालुक्यातील इतर अविकासंस्थेत आहे सदर कट्ट्याचे पैसे कोणाच्या खिशात तर जात नाही ना? असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी विचारीत आहे तसेच याबाबत कोणीही समाधानकारक उत्तर देत नाही? त्यामुळे संबंधित कट्ट्याचे पैसे मिळण्याची मागणी येरकड येतील शेतकरी मधुकर जगन्नाथ भैसारे जयवंत मनिराम मडावी सौ रखमाबाई नरोटे अशोक नामदेव कोल्हे शंकर समारू मडावी यांनी धानोरा येथील व्यवस्थापक उपप्रादेशिक कार्यालय धानोरा यांना निवेदनातून मागणी केली आहे