बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञानच जगात शांतता प्रस्थापित करु शकतो , बुद्ध विचारसरणी अंगिकारा – अँड. बांबोळकर

श्री विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज १३। स्पर्धेच्या युगात मानव नैतिक मुल्ये बाजुला सारुन केवळ आपले बल सिद्ध करण्यासाठी धडपड करतांना दिसत आहे या चुकिच्या मार्गक्रमणाने मानसाला तात्पुरते समाधान वाटत असले तरी भविष्यात अश्या विचारांचे दुष्परिणाम पहावयास मिळतिल प्रगती करणे हे मानवी कर्तव्य आहे माञ वाटचाल करतांना नैतिक मुल्ये जोपासुन प्रगती साधावी युद्धजन्य परिस्थिती टाळण्या साठी बुद्धाचे विचार अंगिकारणे आवश्यक असल्याचे मत अँड. बाळकृष्ण बांबोळकर यांनी व्यक्त केले

देसाईगंज च्या गांधी वार्डातिल सम्राट अशोक बुद्ध विहारात तिन दिवसिय धम्मदेसना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी बौद्ध समाज कोअर कमटीचे अँड. बाळकृष्ण बांबोळकर म्हणाले की आपल्याला सर्वञ स्पर्धाजन्य परिस्थिती पहावयास मिळते आपले बलत्व सिद्ध करण्यासाठी मानुस वाटेल त्या मार्गाने कार्य करतांना दिसत आहे स्पर्धा असलिच पाहिजे माञ त्याला नैतिकतेचा आधार असला पाहिजे जिवनात प्रगती झाली तरी त्याला नैतिकतेची जोड असणे आवश्यक आहे भगवान बुद्धाचा धम्म नैतिकतेचे जिवन जगणे शिकवितो प्रेम मैञी करुणा आणि बंधुभाव हे विचार आचरणात आणल्यास युद्धजन्य परिस्थितीवर सहज मात करता येते बुद्धाचा धम्म आचरणातुन अंगिकारा असे विचार बांबोळकर यांनी व्यक्त केले

या प्रसंगी कोअर कमेटी चे डाकराम वाघमारे इंजि नरेश मेश्राम राजरतन मेश्राम प्रकाश सांगोळे जगदिश बद्रे उद्धव खोब्रागडे भिमराव नगराळे द्रोपदी सुखदेवे कल्पना वासनिक आशा दहिवले उषाकिरण बंसोड निर्मला रामटेके इंदु तितरे वैशाली बोरकर यांचेसह मंडळाचे सर्व सदस्य व बौद्ध बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय बंसोड व आभार पंकज मेश्राम यांनी मानले ।।