लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते सफाई कामगारांचा सत्कार

श्री.विलास ढोरे , प्रतिनिधी, न्यूज जागर 

सध्या संपूर्ण देशात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात सर्व जनता साजरी करत आहेत मात्र आरमोरी नगर परिषदेचे सफाई कामगार आपली सफाईचे कार्य अविरतपणे सुरू ठेवत असून आज पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळपासून या सफाई कामगारांनी आपले स्वच्छतेचा काम हाती घेतला ही बाब आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या लक्षात येताच ते आज शिवनी येथील एका कार्यक्रमाच्या दौऱ्यावर जात असताना या सफाई कामगारांचा आरमोरी येथील स्थानिक इंदिरा गांधी चौकात शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराच्या वेळी आरमोरी येथील भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष पंकज खरवडे सामाजिक कार्यकर्ते नंदू नाकतोडे ओबीसी आघाडीचे तालुकाप्रमुख जितू ठाकरे उत्सव आंबटवार युगल समृतवार हुसेन ठाकरे गुलाब मने आणि आरमोरी येथील प्रतिष्ठित नागरिक व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

सदर सत्काराच्या प्रसंगी सफाई कामगार यांचा पहिल्यांदाच आमदारांच्या हस्ते सत्कार झाल्यामुळे सफाई कामगार भारावून गेले आणि ते पहिल्यांदा सत्कार केल्यामुळे आमदार महोदयाचे हार्दिक आभार मानले सदर कार्यक्रमाच्या वेळेस आरमोरी येथील बहुसंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.