पोलीस मदत केंद्र कोटगुल तर्फे समस्यांचे निराकरण आणि विध्यार्थी आणि युवकांना मार्गदर्शन

 

श्री. श्याम यादव कोरची प्रतिनिधी, न्यूज जागर

पोलीस मदत केंद्र कोटगुल दुर्गम भागातील गावात भेट दिली गावकरी लोकांसोबत चर्चा करून गावातील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू असे मार्गदर्शन केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना वृत्तपत्राचे महत्व पटवून त्यात शासकिय नोकरी संदर्भातील जाहिराती बघून पात्रतेनुसार पोलिस मदत केंद्र कोटगुल येथे येऊन मोफत फार्म भरावे

मुख्यालया पासुन 35 ते 40 कि.मी अंतरावर कोटगुल हे गाव आहे. या गावात गटग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, शासकिय माध्यमिक आश्रम शाळा, टिपागड विघालय, धनंजय स्मृती विघालय देऊळभट्टी, तसेच कोटगुल येथे आठवडी बाजार भरत असून या परिसरात सहा ग्रामपंचायत आहे, या परिसरात दहा हजार लोकसंख्या वर आहे परंतु बरेच गांव घनदाट जंगलाने व्यापलेले असून नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील आहे.

कोटगुल पोलीस मदत केंद्रातील पोलिसांनी वेळोवेळी या दुर्गम भागातील नाडेकल, गागीन, प्रतापगड, बेतकाठी, खसोडा, सोनपुर, एडजाल, आदि गावांना भेटी देऊन गावकरी महिला ,पुरुष, यांच्या सोबत चर्चा करून पाणी,विघुत, रस्ता, शिक्षण, आरोग्य, विविध दाखले, सातबारा, ज्या लोकांना राशन दुकानात मिळत नाही त्यांना मिळण्यासाठी प्रयत्न केले तसेच बंद बोरीग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार अशा अनेक विषयासह शासनाच्या विविध योजना संदर्भा चर्चा करण्यात आली. तसेच दुर्गम भागातील नागरिकांनी नक्षल चळवळीस सहकार्य करू नये असे आव्हाहन कोटगुल चे प्रभारी अधिकारी आनंद जाधव व पोलिस उप निरीक्षक नरेंद्र पिवाल यांनी ग्राम पुत्तरगोंदी येथील ग्रामभेट दरम्यान केले.