माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज – स्थानिक मोहसीन भाई जव्हेरी महाविद्यालय देसाईगंज येथे भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांची १४ नोव्हेंबर जयंती ‘बाल दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. सुनील चौधरी यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले तथा पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकून आधुनिक भारताच्या जडण-घडनिमध्ये, विकासामध्ये त्यांचे योगदान विषद केले. याप्रसंगी ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रा. नाजीम शेख यांनी सुद्धा आपले विचार प्रकट केले. याप्रसंगी चद्रकांत खोके, नंदकिशोर अटालकर, संजय बुरडे, सतीश कोलार्वर, कपिल ढोरे प्राध्यपक वृंद, शिक्षेकेत्तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.