श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते चेक सुपूर्द.
वडसा/उसेगाव
वडसा तालुक्यातील उसेगाव येथे काही दिवसापूर्वी स्व. प्रेमलाल तुकाराम प्रधान हे वाघाच्या हल्ल्यात ठार झाले असता आज आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते वन विभागाकडून 9,75,000/- लाख रुपयांचा चेक प्रतिभा प्रेमलाल प्रधान व त्याच्या कुटुंबाला सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रा.वडसा विजय धांडे साहेब,क्षेत्र साहाय्यक वडसा के.वाय कऱ्हाडे, वनरक्षक एस.एम.गोंगले उसेगांव, सौ.सुषमा धर्मा सयाम सरपंच गट ग्रामपंचायत शिवराजपुर,दिपक प्रधान सदस्य ग्रामपंचायत शिवराजपुर,मारोतराव दोनाडकर, पांडुरंग बोरकर, गुरुदेव उरकुडे,देवराव कांबळी, शरद प्रधान व गावातील नागरिक उपस्थित होते.