समाजवादी पार्टी,देसाईगंज तर्फे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती निमित्त पाणी वाटप .

श्री.भुवन भोंदे ,प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज 

आदिवासी समाजाचे महानायक भगवान बिरसा मुंडा यांची जयंती देसाईगंज येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. देसाईगंज व आजूबाजूच्या परिसरातील अनेक आदिवासी पुरुष, महिला व मुले, मुली एकत्र येऊन रैली काढण्यात आली.मोठा जनसमुदाय या रैलीमधे सहभागी झाला. यावेळी सामाजिक कार्याची आवड असणारे,सदैव तत्पर असणारे सामाजिक कार्यकर्ते व समाजवादी पार्टी देसाईगंज चे शहराध्यक्ष नरेश प्रभाकर वासनिक यांच्यातर्फे रैलीच्या आदिवासी जनतेला पांणी वाटप करण्यात आले. याप्रसंगी तुषार राहटे, मिसबाह शेख, बंटी तोड़ासे, वैभव चिकराम, हितेश कोसरे, समीर सपाटे, मयूर ठाकुर, नैना वासनिक आदि उपस्थित होते.