विसोरा येथे ८६ एसआरपीएफ जवानांनी केले रक्तदान

श्री.भुवन भोंदे ,प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज

राज्य राखीव पोलिस बलातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांची सामाजिक बांधिलकी वाढावी तसेच जनता व पोलिस दल यांच्यात सलोखा वृद्धींगत व्हावा या उदात्त हेतुने विसोरा येथील एसआरपिएफ कॅम्प मध्ये समादेशक विवेक मासळ यांच्या मार्गदर्शनाखाली एसआरपिएफ बल गट क्रमांक – १३, गडचिरोली जिल्हा रक्तपेढी, देसाईगंज ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र सावंगीच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत महिलांची रक्तदान शिबिर व निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीरात तब्बल ८६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शिबीरात ७१ महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिरामध्ये विसोरा राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक – १३ चे समादेशक सहाय्यक डी.एस.जांभुळकर, देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अविनाश मिसार,पोलिस निरीक्षक एस.एन.गाडेकर, पोलिस निरीक्षक पी. डी. एकोणकर, पोलिस उपनिरीक्षक एन.आर.फणसे, पोलिस उपनिरीक्षक एस.डी. तितीरमारे, पोलिस उपनिरीक्षक एच. धनविज व पोलिस अंमलदार, कर्मचारी व शासकीय निवासस्थानातील पोलिस कुटुंबियांनी सहभाग घेतला होता.

रक्त संकलन गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी केले तर आरोग्य तपासणी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिषेक कुंमरे यांच्या निर्देशानुसार सावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक गहाणे, देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रणय कोसे व आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली.