श्री.भुवन भोंदे प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२६/११/२०२२
देसाईगंज
महाराष्ट्र राज्याच्या भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ ह्या दि. १४ नोव्हेंबरला गडचिरोली येथे आले असता देसाईगंज येथील सामाजिक कार्यकर्ते श्री मिलींद सपाटे यांनी त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.सदर निवेदनाला वाघ यांनी गांभीर्याने घेतले असून दि. २१ नोव्हेंबर २०२२ ला चित्रा वाघ यांनी प्रत्यक्ष मिलींद सपाटे यांना भ्रमध्वनीद्वारे आपली मागणी रास्त असून आपण दिलेले निवेदन शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना पाठवित असल्याचे सांगितले. वाघ यांच्या काम करण्याच्या पद्धतीला पाहून लवकरच सपाटे यांच्या निवेदनावर कारवाई होणार असे चित्र दिसून येत आहे.