गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२६/११/२०२२
जि.प.उच्च प्राथमिक शाळा मुरखळा (माल) येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ ला भारतीय संविधान दिन निमित्य शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधान दिनावर आधारित गीत सादर केले.तसेच शाळेतील शिक्षक वृंदानी व विद्यार्थ्यांनी संविधान दिनावर आधारित माहीती व मार्गदर्शन आपल्या भाषनातुन केले.आजच्या या संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक गणेश बोईनवार होते.तर प्रमुख अतिथी म्हणुन पदविधर शिक्षक रघुनाथ भांडेकर,सहाय्यक शिक्षक रमेश गेडाम,अशोक जुवारे,राजकुमार कुळसंगे, जगदिश कळाम,चंद्रकांत वेटे,कमलाकर कोंडावार आदि मान्यवर उपस्थित होते.आजच्या संविधान दिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजकुमार कुळसंगे यांनी केले.तर कार्यक्रमाचे संचालन जगदिश कळाम यांनी केले व कार्यक्रमाचे आभार अशोक जुवारे यांनी मानले.