श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२६/११/२०२२
आरमोरी
आ.कृष्णा गजबे यांच्या प्रयत्नांना यश
आरमोरी नगरपरिषद साठी नागरी स्थानिक संस्थांतील पदांच्या आकृतिबंधास मान्यता मिळण्यासाठी आरमोरी विधानसभेचे आमदार कृष्णा गजबे यांनी मागील 3 वर्षांपासून सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नास यश मिळाले असून आज दिनांक २५ नोव्हेम्बरला २०२२ रोजी शासनाच्या नगरविकास विभागाने आरमोरी नगरपरिषदसाठी नागरी स्थानिक संस्थांतील पदांच्या आकृती बंधास शासननिर्णय काढून मान्यता दिली.
आरमोरी नगरपंचायत, जि. गडचिरोली चे नगरपरिषदेमध्ये रुपांतर झाल्याने नगरविकास विभागाच्या दिनांक १२ फेब्रुवारी २०१८ च्या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आलेला महाराष्ट्र नगरपरिषद संवर्ग सेवांतर्गत पदांचा सुधारित आकृतीबंध संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये आरमोरी नगरपरिषद, जि. गडचिरोली ला लागू करण्यात आला होता. परंतू, संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये निश्चित राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त पदांचा आकृतीबंध देखील लोकसंख्या वाढीच्या प्रमाणानुसार आरमोरी नगरपरिषदेला लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.नवीन निघालेल्या शासननिर्णयांतआरमोरी नगरपंचायत, जि. गडचिरोलीचे नगरपरिषदेमध्ये रुपांतर झाल्याने समाविष्ट लोकसंख्या विचारात घेऊन संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णया सोबतच्या “सहपत्र डु” मधील “(अ) राज्यस्तरीय संवर्गातील पदांव्यतिरिक्त पदे” हा आकृतीबंध लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. तसेच, आरमोरी नगरपरिषद, जि. गडचिरोली च्या लोकसंख्येनुसार प्रथम टप्प्यात एकुण १३ सफाई कामगारांच्या काल्पनिक पदांसाठी आकृतीबंध मंजूर करुन त्याकरिता रू.३७,०६,२४८/- एवढे वार्षिक आवर्ती सहायक अनुदान मंजूर करण्यात येत आहे.
२. उपरोक्तप्रमाणे नवनिर्मित पदे आवश्यकतेनुसार संदर्भाधीन दि. ०५.०७.२०१६ च्या शासन निर्णयातील परिच्छेद क्र.६ येथे नमूद सूचनांनुसार भरण्यात यावीत. तसेच, सदर शासन निर्णयामधील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात आला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने शासनाचे उपसचिव प्रियांका कुलकर्णी यांनी काढलेला आहे.