श्री.भुवन भोंदे,प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२८/११/२०२२
देशाईगंज
देशाईगंज तालुक्यातील कीन्हाळा/मोहटोला या ठिकाणी दिनांक 27/11/2022 रोजी स्वराज्य क्रीडा क्लब कीन्हाळा यांचे सौजन्याने भव्य खुली रात्रकालीन कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आमदार कृष्णा गजबे, भाग्यवानजी खोब्रागडे शिक्षणमहर्षी, यादवजी ठाकरे, गोपाल जी उईके, सुनील पारधी ओबीसी भाजपा जिल्हाध्यक्ष, ज्योती श्रीरामे सरपंच, दिवाकर बारसागडे तं.मु अध्यक्ष, वसंताभाऊ दोंनाडकर महामंत्री, संजय पत्रे पोलिस पाटील, श्रीराम ठाकरे, घोडामजी, पंकज वंजारी उपसरपंच पोटगाव, सूर्यवंशीजी ग्रामसेवक फुले जे.ई. व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते