श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी,न्यूज जागर
दि.२९/११/२०२२
देसाईगंज
वडसा जुनी सा.जा. क्र. 9 येथील कोतवाल स्वर्गवासी श्री.मंगेश नैताम यांच्या पश्चात कोतवाल हे पद गेले 5.6 वर्षा पासून रिक्त असल्याने महसुल विभागाकडून येणाऱ्या कामकाजाची माहिती . शेतीसाठी लागणारे कागदपत्रे कोतवाला अभावी स्थानिक गावकऱ्यांना वेळेवर माहिती मिळत नसल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.शिवाय कोतवाल नसल्याने समंधित विभागाकडून देण्यात येणारी माहिती शेतकऱ्यापरेंत पोहचत नसल्याने दि. 29.11.2022 ला भ्रष्टचार उलमूलन समिती वडसा यांनी मा.नायब तहसीलदार श्री.विलास तूपट सर यांना निवेदन देऊन स्व. श्री .मंगेश नैताम यांच्या कोतवाल या रिक्त पदी लवकरात लवकर त्वरित नवीन कोतवालाची नियुक्ती करणे बाबद निवेदन दिले आहे. मा.नायब तहसीलदार यांना निवेदन देत असतांना उपस्तिथी भ्रष्टाचार उलमूलन समितीचे पदाधिकारी श्री.योगेश नेवारे . मच्छिन्द्र मुळे. घनश्याम कोकोडे. ज्ञानेश्वर कवासे. सुशांत दाणे.जितेंद्र गेडाम.दिवाकर भुते. प्रकाश पत्रे. प्रमोद कवासे हे उपस्तित होते.