चामोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून राजेश खांडवे यांनी स्वीकारला पदभार

चामोर्शी प्रतिनिधी

दि.१/१२/२०२२ चामोर्शी
चामोर्शी पत्रकार समितीद्वारा स्वागत

येथील पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांची गडचिरोली नियंत्रण कक्षात स्थांनातर झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर गडचिरोली पोलिस प्रशिक्षण कक्षात कार्येरतअसलेले राजेश खांडवे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी ३० नोव्हेंबर रोजी येथील पदभार स्वीकारला असतात्यांची भेट घेत चामोर्शी पत्रकार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल व पुष्गुच्छ देऊन स्वागत केले
पोलिस निरीक्षक राजेश खांडवे हे कोल्हापूर जिल्ह्यात सिरोली पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी होते त्यानंतर ते गडचिरोली पोलिस प्रशिक्षण सेंटर मध्ये असताना सी६० मध्ये ही कार्यरत होते त्यामुळे त्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती शौर्य पुरस्कार देण्यात आला होता हे विशेष तेथून त्यांना चामोर्शी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला असता पत्रकार समितीच्या परंपरे नुसारआज दि .३० नोव्हेबर ला येथील पत्रकार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत बुरांडे, उपाध्यक्ष बबन वडेट्टीवार, सचिव कालिदास बनसोड, सहसचिव चंद्रकांत कुनघाडकर, कोषाध्यक्ष अयाज शेख, सदस्य रत्नाकर बोमिडवार,अमित साखरे यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे व पोलिस उपनिरीक्षक सुधीर साठे यांची भेट घेत त्यांचे शाल व पुष्गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पो. नि. राजेश खांडवे यांनी पत्रकारांशी अनेक विषयावर संवाद साधत सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली.