चामोर्शी तालुका प्रतिनिधी, न्यूज जागर
दि.२/१२/२०२२
चामोर्शी
प्रत्येक कर्मचारी आपल्या काम करण्याच्या शौलीत निपून असतात ते कामे करण्यासाठी सदैव झटत असतो अशा हर हुनेरी कामे करणारे श्री. जगदिश नक्षीणे यांचे कार्य सर्व कर्मचाऱ्यांच्या नेहमी स्मरणात राहावे व त्याची ओळख सदैव होत राहावी तेव्हाच त्या व्यक्तीचे कार्य सफल झाले असे प्रतिपादन नगराध्यक्ष जयश्री वायलालवार यांनी नगरपरिषदेचे लेखापाल जगदिश नक्षीणे यांच्या सेवापुर्ती सत्कार समारंभ कार्यक्रमा दरम्यान प्रतिपादन केले .
नगरपंचायत चामोर्शी येथील लेखापाल जगदिश नक्षीणे सपत्नीक त्यांचा शाल, श्रीफळ, साडी -चोळी , भेटवस्तू व पुष्पगुच्छ देवून सेवानिवृतीपर सत्कार करण्यात आला.यावेळी सेवानिवृत्त कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, प्रमुख अतिथी म्हणून उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , महिला बाल कल्याण सभापती प्रेमा आईचवार , नगरसेवक निशांत नेताम, गिता सोरते, स्नेहा सातपुते ,सत्कारमूर्ती जगदिश नक्षीणे सपत्नीक , नगरपंचायतचे कर निरीक्षक भारत वासेकर , अभियंता स्नेहल भुरसे ,लिपिक दिलीप लाडे , बाळा धोडरे, श्रीकात नैताम , प्रभाकर कोसरे ,संतोष भांडेकर ,राकेश कोत्तावार ,सोनी पिपरे , उमाजी सोमनकर , आकाश कोडवते , सुभाष कनकुटलावार ,रमेश कनकुटलावार ,ऋषी गोरडवार ,ईश्वर वाढई , महादेव गेडाम, कृष्णा पाटील , अशोक नवले आदीं उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संचालन लिपिक विजय पेद्दीवार तर आभार कर निरीक्षक भारत वासेकर यांनी पार पाडले .
आपल्या सेवाकाळात त्यांनी अनेक उपक्रमात मोलाची कामगीरी करून न . प . चा दर्जा उंचावण्याचा सदैव प्रयत्न केला तसेच आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी सर्वांची मने जिंकली हा त्याचा सेवा निवृत्ती गौरव आहे.