आदर्श महाविद्यालयात शिष्यवृत्ती पासून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप

श्री.भुवन भोंदे, प्रतिनिधी , न्यूज जागर

देसाईगंज, दि. ५/१२/२०२२

शिष्यवृत्ती वाटप हा स्तुत्य उपक्रम – मान. मोतीलाल कुकरेजा

 

अनेक होतकरू विद्यार्थी आर्थिक कारणाने शिक्षणापासून वंचित राहून ध्येयपुर्ती पासून दूर राहतात. अशावेळी शासनाकडून ज्या विद्यार्थ्यांना कोणतीच सवलत मिळत नाही अशा विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्ती वाटप हा स्तुत्य उपक्रम आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्था सचिव मान. मोतीलाल कुकरेजा म्हणाले. ते आदर्श महाविद्यालयात शिष्यवृत्ती पासून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप उपक्रम प्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर संस्थाध्यक्ष मान.केवळरामजी घोरमोडे, संस्था सदस्य मान. अब्दुल जहीर शेख, मान. संतुमल डोडानी व प्रा.डॉ विठ्ठल चव्हाण मंचावर उपस्थित होते.शैक्षणिक संस्थेचा विद्यार्थी हा केंद्र बिंदू मानून त्याचा व्यक्तिमत्व व सर्वांगीण विकास करणे हे महाविद्यालयाचे कर्तव्यच असते. उच्च शिक्षणाची आवड असणाऱ्या व नियमितपणे महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची ध्येय पूर्ती पुर्ण करण्यासाठी मानवतेच्या भावनेने सहकार्या करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. शिष्यवृत्ती पासून मिळणारी आर्थिक मदत विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्यासाठी वापरून आपले ध्येय प्राप्त करावे” असे आवाहन प्राचार्य डॉ. शंकर कुकरेजा यांनी केले आणि हे उपक्रम यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे धन्यवाद मानले.मागील तीन वर्षांपासून हे उपक्रम महाविद्यालयात राबविण्यात येत आहे. दरवर्षी लाभार्थी विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून २०२२-२३ या सत्रात तब्बल एकूण ५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला. प्रत्येकी रु.१२००/- याप्रमाणे एकूण रु. ६०,०००/- चे वाटप करण्यात आले. कार्यक्रम विद्यार्थी विकास विभागा वतीने आयोजित केला होता. या शिष्यवृत्ती मध्ये नु.शि.प्र.मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, माजी विद्यार्थी, पालक, व इतर देणगीदार यांचा सहभाग आहे.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.विठ्ठल चव्हाण, सुत्रसंचालन डॉ. श्रीराम गहाणे ,आभार प्रा.निलेश हलामी यांनी मानले.