चामोर्शी तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
चामोर्शि,दि.९/१२/२०२२
क्रीडा व युवक सेवा संचालनालय क्रीडा विभाग जि. प.गडचिरोली द्वारा जिल्हा क्रीडा संकुल गडचिरोली येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत जा. कृ.बोमनवार विद्यालयाच्या 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून यश मिळविले असून या संघाची विभागीय स्तरावर निवड झाली आहे.
या संघाला शा.शी .मनोज बोमनवार,प्रमोद भांडारकर, व अनिकेत सोमनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी संघाचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थाध्यक्षा – सौ.छायाताई बोमनवार उपाध्यक्ष – प्र.सो. गुंडावार गुरुजी ,सचिव – रविशंकर बोमनवार , प्र.प्राचार्य – इतेंद्र चांदेकर , प्राध्या. – नमुदेव कापगते ,वर्गशिक्षक , प्राध्यापक ,शिक्षक,शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.



