चामोर्शी तालुका प्रतिनिधी , न्यूज जागर
चामोर्शी, दि.९/१२/२०२२
येथील कृषक हायस्कूल चामोर्शी येथे संत जगनाडे महाराज जयंती संपन्न स्थानिक कृषक येथे आज ८/१२/२०२२ रोजी संपन्न झाली
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अरविंद भांडेकर, प्रमुख उपस्थिती मध्ये रामदासजी शेटे, शाळा समिती सदस्य, सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री विजय कोमेरवार वसुधा कोमेरवार, सुमती कोमेरवार वैभव कोमेरवार, श्रुती कोमेरवार व शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अविनाश भांडेकर मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी कोमेरवार सर यांना स्मार्ट टीव्ही भेट देण्याविषयी मागणी केली कोमेरवार सर यांनी त्यांची मागणी लगेच मान्य करून या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेला स्मार्ट टीव्ही भेट म्हणून दिला यावेळी कोमेरवार सर यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते कोमेरवार सर यांनी संत जगनाडे महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे प्रास्ता विक मुख्याध्यापक अरविंद भांडेकर यांनी तर संचालन वर्षा लोहकरे शिक्षिका यांनी केले कार्यक्रमाला सर्व शिक्षक शिक्षकेतर विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते