संतांचे विचार अंगीकारून समाजाचा विकास साधावा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर यांचे प्रतिपादन

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

चामोर्शी , दि. ११/१२/२०२२

संत शिरोमणी जगनाडे महाराज हे तेली समाजातील एक मोठे समाज सुधारक व समाजासाठी कार्य करणारे महान संत होऊन गेले त्यांच्या कार्य विचारांचा प्रसार व प्रचार करण्याची समाजाला आज गरज असून त्यांचे कार्य सर्व तेली समाजापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे. तेली समाजातही अनेक संत महात्मे झाली याचा आपल्याला अभिमान असायला हवा व संतांचे कार्य व विचारांनी प्रेरणा घेऊन युवकांनी समोरील वाटचाल करावी व समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहावे असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर यांनी केले.

वालसरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात आयोजित संत शिरोमणी श्री संतांजी जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

जय संताजी स्नेही मंडळ, वालसराच्या वतीने येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाटन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष योगिताताई मधुकर भांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी घनश्याम लाकडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस पाटील भगिरथ भांडेकर, मधुकर केशवराव भांडेकर, तं.मु.अध्यक्ष लक्ष्मणराव वासेकर, वालसरा ग्रा.प.च्या माजी सरपंच वनिता वासेकर, रविंद्र ठाकरे, मनोहर दुधबावरे, उड्डान सर, ग्रा. पं. सदस्या शालीनी शेट्टे, नंदाजी बुरांडे, देवदास गव्हारे, आनंदराव कोहळे, मारोती भांडेकर, काशिनाथ कोठारे, शिलाताई भांडेकर, लताताई बुरांडे, रघुनाथ भांडेकर, गुरुदास सोमनकर किशोर कोहळे, मंडळाचे अध्यक्ष गजानन सातपुते, सचिव साईनाथ सुखदेव भांडेकर, उपाध्यक्ष विनायक बारसागडे, सहसचिव राजु शेट्टे, कोषाध्यक्ष संदिप सातपुते, निलेश कोठारे, साईनाथ रुषीजी भांडेकर, मारोती दुधबळे, रामचंद्र भांडेकर, खुशाल दुधबळे, नरेश शेट्टे, रविंद्र भांडेकर, महेश कोठारे, महेश सातपुते, सुरेश भांडेकर, खोजेंद्र चलाख, गणेश भांडेकर, रामचंद्र वैरागडे, गजानन गव्हारे, लक्ष्मण वासेकर, देविदास सातपुते, जितेंद्र सातपुते, तुळशीदास वासेकर, धनराज चलाख, अतुल भांडेकर, अशोक पिपरे, विशाल भांडेकर, बंडु घोंगडे, लक्ष्मण भांडेकर, भिकाजी दुधबळे, कृष्णदेव कुक्कडकर, दयाळ भांडेकर, अशोक कोठारे, वसंत कोठारे, माधव पिपरे, गुरुदास वासेकर, संकेत चलाख, शामराव भांडेकर, सुधाकर गव्हारे, बंडु दुधबळे, प्रविण कोठारे, सुनिल भांडेकर, उद्धव गव्हारे, कृष्णदेव भांडेकर, अशोक भांडेकर, देवराव भांडेकर, गोपाल भांडेकर, हरिदास भांडेकर, रमेश सातपुते, भाऊजी पिपरे, अशोक दुधबळे, वामन सातपुते, मंगलदास सातपुते, सुधाकर गव्हारे, संदिप नैताम, वसंत भांडेकर, अमित भांडेकर, भैय्याजी भांडेकर, भाऊजी भांडेकर, दिवाकर दुधबळे, परशुराम सातपुते, प्रकाश बारसागडे, रुषीजी चलाख, मोरेश्वर घोंगडे, काशीनाथ कुक्कडकर, साहील गव्हारे, बबन भांडेकर, अजय धोडरे, माधव धोडरे, माधव बारसागडे, गणेश कुनघाडकर यासह वालसरा गट ग्रामपंचायत अंतर्गत वालसरा, राजनगट्टा, कुंभारवाही, भिवापुर येथील समस्त तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्वप्रथम श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज व विद्येची देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. तदनंतर वालसरा ग्रामपंचायत अंतर्गत राजनगट्टा व कुंभारवाही येथील तेली समाजातील यावर्षी नव्याने शासकीय नौकरीवर लागलेल्या कर्मचा-यांचा शाल, श्रीफळ सन्मानचिन्ह व पुष्पगूच्छ देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कारमुर्ती मध्ये प्रामूख्याने उमेश शामराव भांडेकर, मयुर शामराव भांडेकर, योगेश नंदाजी बुरांडे, कु.दिपाली गुरुदास बुरांडे यांचा समावेश होता. तसेच जयंतीचे औचित्य साधून राञीला गावातील मुलां-मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. या सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांक-१००१/- चे बक्षिस जय संताची स्नेही मंडळ वालसरा, द्वितीय क्रमांक-७०१/- चे बक्षिस जि. प. गडचिरोलीच्या माजी अध्यक्षा सौ. योगिताताई मधुकर भांडेकर, तृतिय क्रमांक-५०१/- चे बक्षिस महाराष्टृ प्रांतिक तैलिक महासभा सेवा आघाडी जिल्हा गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ भांडेकर, आणि प्रोत्साहनपर चौथे क्रमांक-५०१/- चे बक्षिस लक्ष्मण मसाजी भांडेकर व नरेश लालाजी शेट्टे यांनी संयुक्तपणे दिले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे परिक्षक म्हणुन श्री गुरुदासजी सोमनकर सर यांनी काम पाहीले. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणुन घनश्यामजी लाकडे, रविंद्रजी ठाकरे, मनोहरजी दुधबावरे, भगिरथजी भांडेकर, मधुकरजी भांडेकर, उड्डान सर यासह अनेक मान्यवरांनी श्री संत जगनाडे महाराज व त्या काळात होऊन गेलेल्या समाजातील संत महात्मांच्या जीवन कार्यावर व विचारांवर प्रकाश टाकला. यावेळी वालसरा, राजनगट्टा, कुंभारवाही व भिवापुर येथील तेली समाज बांधव व नागरिक, महिला व युवक-युवती, विद्यार्थी तसेच जय संताजी स्नेही मंडळ वालसराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन श्री साईनाथ भांडेकर यांनी केले तर आभार साईनाथ भांडेकर यांनी मानले.