तुळशी ग्रामपंचायतला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचा तीन लाखाचा पुरस्कार 

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

तुळशी दि.१२/१२/२०२२

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत २०१९-२० या आर्थिक वर्षात जिल्हास्तरावर सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बद्दल देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या तुळशी ग्रामपंचायत ला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा अंतर्गत जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाच्या पुरस्काराने नुकतेच गडचिरोली येथील सुमानंद सभागृहातआयोजीत कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व ३ लाख रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तुळशी ग्रामपंचायतचे सरपंच चक्रधर नाकाडे व सचिव कु.व्ही.एस.वाढई,देसाईगंज पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी प्राजक्ता भस्मे, पंचायत विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले यांनी हा पुरस्कार स्विकारला.
सदर कार्यक्रमाला यावेळी आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक फरेंद्र कुत्तीरकर, ग्रा.पा.पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित तुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र कणसे, देसाईगंज पंचायत समितीच्या संवर्ग विकास अधिकारी प्राजक्ता भस्मे, पंचायत विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले, गडचिरोली जिल्हा सरपंच संघटनेच्या अध्यक्षा अपर्णा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सरपंच चक्रधर नाकाडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच रेखाताई तोंडफोडे आणि माजी सदस्यांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.