वीर बालकांचा आदर्श ठेवून देशाभिमान जागवावा – प्र . प्राचार्य प्रकाश निमकर

चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

चामोर्शी,दि.२६/१२/२०२२

दहावे शिख गुरु श्री गुरु गोविंदसिंह यांचे बलिदानी पुत्र श्री जोरावर सिंह आणि फतेसिंह या वीर पुत्रांनी केलेले सर्वोच्च बलिदान अगदी वयाच्या अवघ्या नवव्या व सहाव्या वर्षी आपला देश अभिमान जागृत ठेवून मुस्लिम राजवटी समोर नतमस्तक न होणाऱ्या शहीद बालविरांचे स्मरण ठेवून देशाभिमान जागवावा असे शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय आमगाव ( म) येथील कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य प्रकाश निमकर यांनी प्रतिपादन केले .
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते तथा मार्गदर्शक अभिषेक ढोंगे व सुरेश केळझरकर तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्याध्यापक विजय मडावी, पुरुषोत्तम गुरुनुले, नरेंद्र चिटमलवार सुवेंदु मंडल, चंदू सातपुते, निशा रामगुंडे , रुचिता बंडावार, अनिल निमजे, गजानन बारसागडे, तिरुपती बैरवार, रतन सिकदर आदी उपस्थित होते.
यावेळी वीर बालक जोरावर सिंह व फत्तेसिंह या वीर बालकांच्या देशाभिमान जीवन कार्यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल निमजे तर आभार निशा रामगुंडे यांनी मांनले. कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे सहकार्य केले.