लिंग आधारित भेदभाव आणि हिंसा समाप्त करण्याच्या दृष्टीने प्रबोधन रॅली चे आयोजन

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर 
देसाईगंज ,दि.०२/०१/२०२३

ग्रामीण विकास मंत्रालय यांनी ” नयी चेतना: पहल बदल की ” नावाची लींग आधारित भेदभाव दूर करण्यासाठी राष्ट्रीय जेंडर मोहीम सुरु केली असून त्याच धरतीवर दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY NULM) अंतर्गत नगर परिषद देसाईगंज चे वतीने मुख्याधिकारी डॉ. कुलभुषण रामटेके यांचे मार्गदर्शनात प्रबोधन रॅलिचे आयोजन करण्यात आले .

प्रथमत: नगर परिषद कार्यालयाचे प्रांगणात लिंगभाव समानता प्रतिज्ञेचे वाचन करुन , कार्यालय अधिक्षक श्री महेश गेडाम यांनी रॅलिला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. रॅलित लिंगभाव समानतेबाबत विविध स्लोगनचे वाचन करुन रॅलि नगर परिषद कार्यालय ते मुख्य मार्गाने हुतात्मा स्मारक- फवारा चौक-गजानन महाराज मंदिर या मार्गाने जाऊन नगर परिषद कार्यालयात रॅलिची सांगता करण्यात आली. या प्रसंगी लेखापाल श्री अविनाश राठोड, रचना सहायक दानिशोद्दीन काजी, अभियंता आशिष गेडाम,साई कोंडलेकर,मंगेश नाकाडे, मंगेश बोंद्रे,सहायक प्रकल्प अधिकारी लवकुश उरकुडे,शहर स्तर संघाच्या सचिव कल्पना वासनिक, लिपीक दिनकर खेत्रे, सिटी को-आर्डीनेटर लिलाधर जुनघरे ,जवाहर सोनेकर, व्यंकट चौधरी, प्रमिला सोनेकर, नरेश येंगलवार, मंगेश चहांदे , तसेच नगर पालिकेचे ईतर कर्मचारी वृंद व बचत गटातील महिला, वस्ती स्तर संघ, शहर स्तर संघातील महिला पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे यशस्वीतेकरीता समुदाय संघटक अरुण मोटघरे ,सहयोगीनी आशा खरकाटे, सिंधूताई रामटेके तसेच शहरातील शहर संघ,वस्ती स्तर संघ व बचत गटांचे पदाधिकारी यांनी सहकार्य केले.