श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर
कोरची,दि.०५/०१/२०२३
मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे नागरिकांचा भ्रमनिरास
हजारो नागरिकांची उपस्थिती : ६० गावांची राजमाता असल्याची मान्यता
कोरची तालुक्यातील कुंमकोट येथे ४ जानेवारी रोजी मंडईचे आयोजन करण्यात आले होते. या मंडईला पंचक्रोशीत भाविकांची खूप मोठी गर्दी उसळली होती. कुंमकोट येथील मंडईला राजदेव मंडई असे संबोधले जाते. कुंमकोट येथील मंडई झाल्यानंतरच परिसरातील गावामध्ये मंडई आयोजित केल्या जातात. त्यामुळेच कुंमकोट येथील मंडई पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. परंतु मागील दोन वर्षापासून कोविड 19 चे काळात मास्कचा व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून भाविकांना पूजेसाठी मान देण्यात आला व शासनाचे काटेकोरपणे नियम व शर्तीचे पालन करण्यात आले होते. परंतु वेळीच शासनाने जमावबंदीचे आदेश आल्यामुळे मंडई भरवण्यात आले नाही त्यामुळे भाविकांनी देवीची पूजा करून परतले होते अनेकांना मंडईची मज्जा घेता आली नाही यामुळे जणांचा भ्रमनिरास झालेला होता. परंतु यावेळी मंडई भरल्याने हजारो भावीकांच्या चेहऱ्यावर आंनद बघायला मिळाला.
या मंडईसाठी दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने येतात या गावात राजमाता व मारुतीचे अतिशय जुने मंदिर आहे कुंमकोट येथील मंडई पंचक्रोशीत प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी उसळते. वर्षागणिक भाविकांची गर्दी वाढत चालली आहे मंडई मध्ये खेळणी, झुले, कपडे, भाजीपाला, प्रसाद आधी विविध प्रकारची दुकाने लावली होती. दोन वर्षानंतर भाविकांच्या गर्दीने कुंमकोट गावाचा परिसर फुलून गेला होता. मंडईच्या दिवशी राजमाता व इतर देवी देवतांची विधिवत पूजा करण्यात आली यासाठी गावकरी आयोजकांनी व ग्रामपंचायतीच्या वतीने भाविकांना सोयीसुधा पुरवल्या होत्या.
कुमकोट राज राजेश्वरीदेवी-देवतांचे पूजेची सुरुवात राजवैद्य राजीमसाय रामसाय कल्लो पुजारीकडून होत असून सोबतीला ६० गावातील पुजारी असतात.
कोरची तालुक्यातील कुंमकोट येथील मंडई प्रसिद्ध आहे मंडई निमित्ताने परिसरातील ६० गावांपेक्षा जास्त गावातील पुजारी एकत्र येऊन पारंपारिक पद्धतीने राजमातीची पूजा करतात. हातात संकल, त्रिशूल, बांबूचे झेंडे पकडून मंडईच्या सभोवताल तीन फेरे मारले जातात. त्यानंतर पूजेच्या शेवट होतो. हे फेरे बघण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते कोरची तालुक्यातील बहुतांश गावे छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून आहेत त्यामुळे या गावांमधील नागरिकांवर आदिवासी संस्कृती बरोबर छत्तीसगढी संस्कृतीचा प्रभाव आहे मंडई नंतर रात्री छत्तीसगढी लोककला नृत्याचे आयोजन करण्यात आले या नृत्याच्या माध्यमातून रात्रभर नागरिकांचे मनोरंजन झाले.