चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.०६/०१/२०२३
येथील स्वामी विवेकानंद मतिमंद विद्यालय येथे पत्रकार सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस हा पत्रकार दिन म्हणून आज सकाळी आठ वाजता चामोर्शी पत्रकार समितीतर्फे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगरपंचायतच्या अध्यक्ष जयश्री वायलालवार तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रत्नाकर बोमीडवार, नगरपंचायतचे उपाध्यक्ष तथा पत्रकार समितीचे अध्यक्ष लोमेश बुरांडे आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. तसेच मान्यवरांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे संचालन चंद्रकांत कुनघाडकर तर आभार प्रदर्शन गजानन बारसागडे यांनी केले. यावेळी या कार्यक्रमाला पत्रकार समितीचे कोषाध्यक्ष अयाज शेख, अमित साखरे व मतिमंद विद्यालयाचे कर्मचारी राजेंद्र गाजरलावार , शेखर पेन्दोर ,सीमा खोब्रागडे यांनी सहकार्य केले.