श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधि,गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर
कोरची,दि.०७/०१/२०२३
कोरची शहरातील वार्ड नंबर ०२ मधील प्रतिष्ठित शेतकरी बाबुलाल ढेकलुजी भैसारे (५५) यांची शुक्रवारच्या मध्यरात्रो घरी आकस्मिक प्रकृति खराब झाली त्यांना कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान शनिवारला दुपारी १:३० वाजता दुःखद निधन झाले आहे.
कोरची नगरपंचायत नगराध्यक्षा सौ हर्षलता भैसारे यांचे भासरे तर शहरातील प्रतिष्ठित व्यापारी केवलजी भैसारे यांचे मोठे बंधु आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, जावाई नातवंड असा बराच मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कोचीनारा घाटावर रविवारी १०:३० वाजता अंतविधी करण्यात येणार आहे.