यशस्वी होण्यासाठी ध्येयाची गुढी उभारा : डाॕ.प्रशांत ठाकरे महाराज

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज दि.११/०१/२०२३

सोळावं वय धोक्याचे असे म्हटले जात असले तरी संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महापुरुष व संतांनी अल्प वयात महान कार्य केले आहे. तरुणपण म्हणजे झोपाळ्यावर झोपण्याचे वय नसून सोळा वय म्हणजे मौक्का (संधी) चे वय आहे.या वयातच विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी ध्येयाची गृढी उभारली पाहीजे,असे मत डाॕ.प्रशांत ठाकरे महाराज यांनी व्यक्त केले. ते तुळशी येथिल शिवाजी विद्यालयात व्यक्तीमत्व विकास याविषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
डाॕ.प्रशांत ठाकरे महाराज यांनी नुकतीच तुळशी येथिल शिवाजी विद्यालयाला सदिच्छा भेट दिली व शाळेतील विद्यार्थ्यांना व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. डाॕ.प्रशांत ठाकरे महाराज उच्च शिक्षित असून उत्तम वक्ते ,भागवतकार ,प्रवचनकार आहे. त्यांनी “वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गद्य वाड़मय” याविषयाव पीएचडी संपादित केली असून ग्रामगीतेतील विचार प्रवचन, मार्गदर्शन यातून नागरीक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे ते कार्य करीत आहे.
यावेळी पुढे मार्गदर्शन करतांना डाॕ.प्रशांत ठाकरे महाराज म्हणाले, विद्यार्थ्यांनी परिस्थितीचा बाहु न करता परिस्थितीवर मात करुन आपले ध्येय साध्य केले पाहिजे. अत्यंत गरीब परिस्थितीतही अनेक महापुरुष , विचारवंत व शास्त्रज्ञ यांनी नेत्रदीपक यश संपादीत केले आहेत. त्यामुळे व्यसनाच्या आहारी न जाता आईवडिलांची प्रामाणिक सेवा केली पाहीजे. मिळालेले तारुण्य इतर व्यर्थ गोष्टीत खर्ची न घालता देशासाठी खर्ची घातला पाहिजे, असा मोलाचा उपदेश यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना केला.
त्यांनी अंधश्रध्दा , सामाजिक जाणीव, गावविकास, शिक्षणाचे महत्व इत्यादी विषयावर प्रकाश टाकला.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विष्णू दुनेदार तसेच शिक्षक कैलाश गजापूरे ,दुर्गाप्रसाद चुलपार ,नाशीक शेंडे, निलकंठ मारबते,संदीप शेंडे,मिलिंद मेश्राम ,विशाल बुल्ले ,उपस्थित होते.