मानव धर्मांत जगण्यासाठी आवश्यक आहे मानस महोत्सव डॉ मुरलीधर रुखमोडे

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा ,न्यूज जागर 

कोरची,दि.२१/०१/२०२३

स्वर्गीय शामलाल मडावी स्मृती उजाळा देण्यासाठी दोन दिवसीय सस्वर मानस महोत्सव आयोजन

माणसाला नेहमीच सणांची आवड असते, त्यामुळेच तो आध्यात्मिक आनंदाच्या शोधात सतत झटत असतो.आनंद मिळवण्यासाठी मानस महोत्सवाला आत्मसात करण्यासाठी आयुष्यात अनेक सणांची गरज असते. स्वर्गीय शामलाल मडावी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित दोन दिवसीय सस्वर मानस महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात डॉ.मुरलीधर रुखमोडे बोलत होते.
सतचंडी मानस परिवार कोरची सदर महोत्सव २१ व २२ जानेवारीला कोरची येथे शनिवारी २१ जानेवारीला या कार्यक्रमाची उद्घाटक करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ. हर्षलता भैसारे नगराध्यक्ष नगरपंचायत कोरची हे होते तर या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. डॉ. मुरलीधर रुखमोडे वनश्री महाविद्यालय कोरची यांनी केले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रतापसिंग गजभिये, हकीमुद्दिन शेख, सियाराम हलामी, सदरुद्दीन भामानी, कुमारीबाई जमकातन, धनराज मडावी, दुर्गा मडावी, प्रा. देवराव गजभिये, धर्मसाय नैताम, दिलीप मडावी, मधुकर नकाते, विठ्ठल गुरणुले झगरू मडावी, मनीराम मोहुर्ले, बाबुराव धुवारिया, भास्कर ठोंबरे, हमीद खा पठाण, रतन सहाडा, मडावी, बलदु मडावी आदी उपस्थित होते.

या दोन दिवसीय मानस महोत्सव मध्ये मधुरिमा मानस परिवार बरोदा चौक महासमुंद, हरिकेश मंगलम मानस परिवार बागबहारा, श्री योग वेदांत बालिका मानस मंडली बालोद, मा विद्यादायीनी मानस परिवार सिरसीदा, विनायक मानस परिवार खिशोरा धमतरी, भूमीजा महिला मानस परिवार गुडीयारी रायपूर, सुरसरिता मानस परिवार मोगरापायली उडीसा, तुलसी के बिरवा मानस परिवार नागाबुडा, हे शारदे बालिका मानस परिवार रंजीतपुर, शृंग ऋषी मानस परिवार सिंहावा नगरी, विंदवासिनी महिला मानस परिवार बोडरा बालोद व प्रज्ञा मानस परिवार सोरीदखुर्द गरीयाबंद मानस परिवार या बारा मंडळींनी आपला सहभाग नोंदविला असून पुढील दोन दिवस संपूर्ण कोरची भक्तीमय वातावरणात राममय होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवस या कार्यक्रमाचे संचालन हिरामण मेश्राम करणार असून, प्रस्तावना जीवन भैसारे व आभार कुमारीबाई जमकातन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नसरुद्दीन भामानी, मनोज अग्रवाल, मेघश्याम जमकातन, नंदकिशोर वैरागडे, राहुल अंबादे,तुलीदास अंबादे,अरून नायक,आदि मान्यवर गावकऱ्यांनी सहकार्य केले.