आदर्श महाविद्यालयात सायन्स कार्निवल यशस्वी संपन्न

Adarsh-science-carnival

श्री.विलास ढोरे,वडसा तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर

देसाईगंज,दि.०२/०२/२०२३

येत्या काही दिवसांतच बारावीची परीक्षा होऊ घातलेली आहे. अशात बारावी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारीत प्रयोगाचे विश्लेषण (एक्सपेरिमेंट एक्सप्लेनेशन) करून अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने असलेल्या शंकांचे निरसन करून त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी स्थानिक आदर्श महाविद्यालयात सायन्स कार्निवलचे आयोजन करण्यात आले. यात विज्ञान शाखेच्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व वाणिज्य शाखेच्या संगणकशास्त्र या विषयावरील विविध प्रयोगांचे विश्लेषण ११ व १२ वीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना करून दाखविले. महाविद्यालयात विज्ञान शाखा गेल्या चार वर्षांपासून सुरू असून अगदी अल्पावधीतच सर्व सोयींनी युक्त, सुसज्ज, केमीकल व साहत्यांनी परिपूर्ण अशी प्रयोगशाळा तयार आहे.
सायन्स कार्निवल साठी देसाईगंज तालुक्यातील सर्व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व अर्जुनी/ मोर तालुक्यातील गौरनगर येथील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले. ही सायन्स कार्निवल ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी ला विद्यार्थ्यांसाठी खुली खुली ठेवण्यात आले.

 

science carnival programme success at adarsh mahavidyalaya
सायन्स कार्निवल साठी प्राचार्या सुलभा प्रधान, आदर्श कनिष्ठ महाविद्यालय, मान. प्राचार्य बुध्दे, म. गांधी कनिष्ठ महाविद्यालय, प्राचार्य भावे कुथे पाटील ज्यु. काॅलेज, प्राचार्य, मेश्राम आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, प्राचार्य देशपांडे, यशोदा कनिष्ठ महाविद्यालय, प्राचार्य डॉ शिवणकर राजीव गांधी कनिष्ठ महाविद्यालय तसेच गौरनगर येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य मान. पाऊलझगडे प्रामुख्याने उपस्थित होते.

तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच गौरनगर येथील कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या सायन्स कार्निवलला भेट देऊन अभ्यासक्रम पुरक प्रयोग याविषयी माहिती समजून घेत सायन्स कार्निवलचा लाभ व आनंद घेतला. महाविद्यालयात सायन्स कार्निवलचे आयोजनाबद्दल सर्व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य महोदयांनी कौतुक करून दरवर्षी या सायन्स कार्निवलचे आयोजन करण्याची विनंती केली. सायन्स कार्निवल यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ शंकर कुकरेजा यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शाखेचे प्रा. योगेश तुपट, प्रा. आशिष बुध्दे, प्रा. ज्ञानेश मोहुर्ले, प्रा. कु. डी.एम. पत्रे, प्रा. कु. आदिती नागपुरकर, प्रा. कु. एस.टी. मिसार, प्रा. कु. सुचिता बावणे, प्रा. कु. व्ही.डी. ठाकरे, प्रा. कु. लिना उरकुडे, प्रा. कु.मनिषा कार आणि प्रा. कु. शितल दोनाडकर यांनी अथक परिश्रम घेतले.

by Vilas Dhore , News Reporter @ News Jagar