विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने जल्लोष करून साजरा केला आनंद

चामोर्शी तालुका प्रतिनिधी ,न्यूज जागर 

चामोर्शी,दि.०६/०२/२०२३ 

नुकत्याच पार पडलेल्या नागपूर विभाग( विधान परिषद सदस्य ) शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत सुधाकर अडबाले हे बहुमताने विजयी झाल्या बद्दल विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने जल्लोष करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी या विजयी जल्लोषात चामोर्शी येथील विदर्भ माध्यमिक संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष कैलास भोयर, प्राचार्य इतेंद्र चांदेकर, प्रसिध्दी प्रमुख कालिदास बन्सोड, तालुका अध्यक्ष संजय कुनघाडकर , पोपेश्वर लडके, विनोद सालेकर ,चंद्रमणी रामटेके, अरविंद कुनघाडकर, प्रकाश मट्टे, विनोद उंदीरवाडे, गजानन बारसागडे, कालिदास बुरांडे, काँग्रेसचे राजेश ठाकूर राष्ट्रवादीचे निकेश नैताम अतुल येलमुले, महेंद्र किरमे, विनोद आलेवार, बोडूकवार, साहेबराव घागरे, प्रदीप भुरसे ,आणि जिल्हा परिषदचे जुनी पेन्शन हक्कसाठी झटणारे सर्व कर्मचारी असे बरेच कर्मचारी या विजय जल्लोषात सामील होऊन फटाक्यांची आतिशबाजी करत नवनिर्वाचित शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांचे अभिनंदन केले. News Jagar 
यावेळी साधुबाबा कुटी हनुमान मंदिर ते लक्ष्मीगेट पर्यत विजयी रॅली काढून एकच मिशन जुनी पेन्शनचा नारा देण्यात आला. तसेच पेढे वाटून अभिनंदन करन्यात आले.