श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर
कोरची,दि. १६/०२/२०२३
इंदिरा शिक्षण संस्था आरमोरी द्वारा संचालित वनश्री कला व विज्ञान महाविद्यालय यांचे वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मतदान जनजागृती व नव मतदार नोंदणी अभियान कार्यकारी प्राचार्य तथा राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.विनोद.टी. चहारे यांच्या मार्गदर्शनाखाली गहाणेगाटा येथे राबविण्यात आला.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. आर. एस .रोटके यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख वक्ते म्हणून कोरची तहसीलचे नायब तहसिलदार मा.अनंत. बोदेले,नायब तहसीलदार गणेश. बी. सोनवानी नायब तहसीलदार मा .भगत ,माजी रासेयो. स्वयंसेवक मा. भुवनेश्वर शेंडे ,वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा.प्रदीप चापले आदी उपस्थित होते.
प्रा .आर. एस.रोटके यांनी,भारत देश हा लोकशाही प्रधान देश असून लोकशाही प्रबळ करण्यासाठी मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती होणे आवश्यक आहे.भारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा अधिकार बजावणे हे अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी मतदार जागृती व शिक्षण कार्यक्रम फार महत्वाचा घटक ठरला आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.
नायब तहसीलदार मा.गणेश. बी .सोनवानी यांनी मतदार नोंदणी व त्यासाठी लागणारे कागदपत्रे यांची पूर्ण माहिती दिली कार्यक्रमानंतर वय अठरा वर्षे पूर्ण झालेल्या गहाणेगाटा येथील व निवासी शिबिरातील मुला -मुलींची मतदार नोंदणी करण्यात आली. Newsjagar
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुलाब बावनथडे व सूत्रसंचालन रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी कु.धर्मिन भक्ता तर आभार कु.शशिकला पुडो हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रासेयो विद्यार्थी प्रतिनिधी कु.सुशांत नंदेश्वर व निवासी शिबिरार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनि तसेच शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाला गहाणेगाटा, हुडुकधूमा,बोरी येथील पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.