चामोर्शी तालुका प्रतिनिधी,न्यूज जागर
चामोर्शी,दि.२०/०२/२०२३
दुसऱ्या दिवशीही मर्कांड्यात भाविकांची मांदियाळी
महाशिवरात्रीच्या अमावशेला विधी ची परंपरा
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणून ओळख असलेल्या मार्काडा देव येथे महाशिवरात्री च्या पर्वावर यात्रेला प्रारंभ झाला राज्यातील व राज्याबाहेरील भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते १९ ला अमावस्या असल्याने परंपरे नुसार मंदिराच्या शिखरावर व नदीच्या तीरावर तेलाचे दिवे सायंकाळी o६ वाजता मंदिर परिसर दिव्याच्या प्रकाशने उजळून निघाला होता.
वैनगंगा नदीच्या डाव्या तीरावर बांधलेले हे प्राचीन मंदिर असून येथे वैनगंगा नदी उत्तर वहिनी असल्यानेच हे स्थळ भाविकांच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहे.त्यामुळे येथे महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेला भाविकांच्या दृष्टीने फार महत्त्व असते . त्यामुळे १९ फरवरी रोजी सायंकाळी०६ वाजता मंदिराच्या कळसावर व्याहाड बुजुरुक येथील प्रशांत म्हाशाखेत्री, व राजू म्हाशाखेत्री , अरुण गायकवाड, पंकज पांडे, रामू महाराज गायकवाड यांचे हस्ते दिवे लावण्यात आले. Markanda Mandir Chamorshi Gadchiroli
दिवे लावण्याचा मान गेल्या अनेक पिढ्यांपासून म्हाशाखेत्री कुटुंबाला मिळत आहे हे विशेष.दिव्याचे महत्व असल्याने या दिवशी भाविक आवर्जून उपस्थित असतात याप्रसंगी, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड, विश्वस्त माजीखासदार मारोतराव कोवासे, सहसचिव रामूजी तीवाडे विश्वजित कोवासे,व कर्मचारी त्यासह चंद्रकांत दोषी, सौ साधना दोशी, उपेश हेपिज, नानाजी बुरांडे, दादाजी बारसागडे आदी उपस्थित होते. यावेळी पंढरपूर येथील जगन्नाथ महाराज भजन मंडळ उपस्थित होते. News Jagar