कोरची नगरात मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा केला

श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी  गडचिरोली जिल्हा,न्यूज जागर

कोरची,दि.२०/०२/२०२३

छत्रपती शिवाजी महाराज यांचे 393 वी जयेंत्ती च कार्यक्रम शिवसंग्राम मित्र मंडळ माळी समाज कोरची च्या वतीने साजरा करण्यात आले,,,त्यामध्ये ठिक 12:00 वा, ध्वजारोहण करण्यात आले,दुपारी 2:00 ते 5:00 प्रबोधन मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले,सायंकाळी 6:00ते8:00 शिवऱ्याली व रात्रो 8:00 ते 10:00 शिवभोजन संपूर्ण जनसमुदाया करिता देण्यात आले,

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सुरेश रोरते, उद्घाटक प्रा.मुरलीधर रुखमोडे , सहउद्घाटक तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष मनोजभाऊ अग्रवाल,,प्रमुख पाहुणे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्ष नाशिरभाई भामानी, प्रमुख मार्गदर्शन गजबीये सर,शालीकराम कऱ्हाडे सर,तसेच प्रमुख पाहुणे आशिषभाऊ अग्रवाल, गुडुभाऊ अग्रवाल, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चेतन कऱ्हाडे, देवाजी मोहूर्ले, नगर सेवक धनराज मडावी, डा. स्वप्नील राऊत, प्रशांत मोहूर्ले, हंसराज मोहूर्ले, बेबीबाई मोहूर्ले, निराशाताई गावतुरे, सुशीलाबाई मोहूर्ले,कलाबाई शेंडे, उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात सुरेश रोरते यांनी मार्गदर्शनपर शिवाजीराजे यांचे जीवन,समाजातील जातीप्रता,व्येसनाधिनतां
यावर मार्गदर्शन केले,समाजातील जातीभेद दूर करून सर्वानी एकत्रित येऊन सर्वच महापुरुषांच्या विचाराचे मंथन करावे आणि अशे  कार्यक्रम नेहमी आयोजित करावे असे कार्यक्रमाचे उदघाटक रुखमोडे सर मार्गदर्शनात आव्हान केले ,
कार्यक्रमचे संचालन राकेश मोहूर्ले, तर उपस्थितांचे आभार संतोष मोहूर्ले यांनी मानले. News Jagar 

कार्यक्रमच्या येशस्वितेसाठी शिवसंग्राम मित्र मंडळ यांचे अध्यक्ष प्रवीण गुरनुले,उपाध्यक्ष विक्की मोहूर्ले, सचिव अजित मोहूर्ले, प्रणय मोहूर्ले, सोहेल खान, चेतन मोहूर्ले, शौर्य वाढई, अंकुश, अरबाज अस्लम, सपन खरवडे , मानसी वाढई, उत्कर्षा मोहूर्ले,अमोल जेंगते, राज मोहूर्ले ,गौरव गुरनुले , श्रीहरी मोहूर्ले यांनी परिश्रम घेतले तसेच 
 तसेच संपूर्ण माळी समाजाने सहकार्य केले