श्री.नंदकिशोर वैरागडे,विशेष प्रतिनिधी गडचिरोली जिल्हा ,न्यूज जागर
कोरची,दि.२०/०२/२०२३
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. अरविंद टेंभूरकर सर मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कोरची यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून मा. प्रमोदिनी काटेंगे, मा. कांता साखरे, मा. महेश जाळे, मा. मारोती अंबादे होते. “जानता राजा छत्रपती शिवाजी महाराज” यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लगेचच “जय जय महाराष्ट्र माझा” हे महाराष्ट्राचे राज्यगीत गायन करण्यात आले. साक्षी मेश्राम, प्रिनल शेंडे, करिश्मा धोंडणे या विद्यार्थ्यीनीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भाषणे दिली. काही विद्यार्थ्यांनी गीत गायन केले.
कार्यक्रमाचे संचालन कांता साखरे यांनी केले तर आभार प्रमोदिनी काटेंगे यांनी मानले. विद्यार्थ्यांना खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. newsjagar