चामोर्शी तालुका प्रतिनिधी
चामोर्शी,दि.२१/०२/२०२३
हजारो रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ
राष्ट्रीय आरोग्य अभियान, ग्रामीण रुग्णालय चामोर्शी च्या वतीने दिनांक 15 फरवरी ते 18 फरवरी या चार दिवसीय निशुल्क भव्य वैद्यकीय व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यात हजारो रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला
या आरोग्य शिबिराचे उदघाटक म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल रुडे तर सहउदघाटक म्हणून नगर पंचायत चामोर्शी चे महिला व बाल कल्याण सभापती सौ. प्रेमाताई अमोल आईचवार, अध्यक्ष म्हणून गडचिरोली सामान्य रुग्णालययाचे भीषक डॉ आय. जी. नागदेवते, तर प्रमुख अतिथी स्त्रीरोग तज डॉ. बिधान देवरी, वैदेही राठोड,बालरोग तज डॉ. केतन तलमले, डॉ. अत्यलागडे, कान, नाक, घसा तज डॉ.साळवे, सर्जन डॉ.पारशिवणी, दंत चिकित्सक डॉ.शानगोंडा, रुग्ण समितीचे सदस्य रनेन मंडल,आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिराचे प्रास्ताविक करताना वैद्यकीय अधीक्षक डॉ एल. ए. मदने यांनी शिबिर घेण्यामागील उद्देशसांगितले.
या चार दिवसीय निशुल्क भव्य वैद्यकीय व दंत चिकित्सा शिबिरात तज्ञ वैद्यकीयअधिकाऱ्याकडून एकूण 1617 रुग्णांनी लाभ घेतले त्यापैकी पुरुष रुग्ण 706तर 911स्त्री रुग्ण होते. वरील रुग्णा पैकी अंडवृद्धी शस्त्रक्रिया 4, हर्निया शस्रक्रिया 1, कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया 4, फायमोसिस चे 1, गाठीचे शस्त्रक्रियाचे 2, इतर किरकोळ आजारावरील शस्त्रक्रिया 1 असे एकूण 13 रुग्णाचे यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आले.आणि उर्वरित 1604 पैकी बीपी शुगर तपासणी 365, बालके 202,नेत्र 90, दंत चिकित्सा 96, तर 508 प्रयोग शाळा तपासणी, 91एच. आय. व्ही तपासणी, एक्स रे – 52, केले तर उर्वरित 402 रुग्णांनी किरकोळ आजारावर उपचार करून औषधोपचार घेतले. newsjagar
या शिबिराकरिता जिल्हा जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील एन. सी डी. विभाग, टाटा मेमोरीयल विभाग गडचिरोली, मानसिक रोग विभाग, आरोग्य कार्ड विभाग, तसेच तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय चामोर्शी येथील अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहकार्य केले.